Showing posts with label भावी मराठी पंतप्रधान. Show all posts
Showing posts with label भावी मराठी पंतप्रधान. Show all posts

Wednesday, July 28, 2021

संजय उवाच

आजची वात्रटिका
---------------------

संजय उवाच

संजयाची दूरदृष्टी बघून,
चर्चेला नव्याने उधाण आहे.
महाराष्ट्रात म्हणे आणखी एक,
भावी मराठी पंतप्रधान आहे.

राऊत दामटतात घोडे,
त्यांचा नव्या स्वप्नांचा पिच्छा आहे!
पहिल्या भावी पंतप्रधानांची,
नव्या पंतप्रधानाला शुभेच्छा आहे!!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6217
दैनिक पुण्यनगरी
28जुलै2021

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...