Tuesday, March 10, 2020

तुका आकाशाएवढा

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
--------------------------------------------
तुका आकाशाएवढा.....
तुकोबा,आता तुम्हीच सांगा
ते विमान कसले होते?
कोण होते ते पुण्यवान?
ज्यांना विमान दिसले होते?
आम्ही वारसदार त्या करंट्याचे
जे विमान पाहू शकले नांही.
श्रद्धेशिवाय खरा पूरावा
कुणीच देवू शकले नाही.
तुकोबा,
तुमचे आभाळाएवढे कर्तृत्त्व
विमानात बसूच शकत नाही !
इंद्रायणीच्या डोहातले सत्य
तपासल्याविना दिसूच शकत नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
चिमटा-1816
दैनिक पुण्यनगरी
12मार्च2009

शॅडो कॅबिनेटचा भावार्थ

आजची वात्रटिका
---------------------------------------
शॅडो कॅबिनेटचा भावार्थ
'शॅडो कॅबिनेट'चा अर्थ लावण्याची,
लोकशाहीत पुर्णपणे मुभा आहे.
भावाच्या पाठीमागे भाऊ,
अगदी सावली बनून उभा आहे.
खऱ्या कॅबिनेटवरती,
शॅडो कॅबिनेटची सावली आहे !
दुधाची तहान ताकावर,
ही कल्पना मात्र भावली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7231
दैनिक झुंजार नेता
10मार्च2020
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

शिमगा:लोकमनाची वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------------------
शॅडो कॅबिनेटचा भावार्थ
'शॅडो कॅबिनेट'चा अर्थ लावण्याची,
लोकशाहीत पुर्णपणे मुभा आहे.
भावाच्या पाठीमागे भाऊ,
अगदी सावली बनून उभा आहे.
खऱ्या कॅबिनेटवरती,
शॅडो कॅबिनेटची सावली आहे !
दुधाची तहान ताकावर,
ही कल्पना मात्र भावली आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7231
दैनिक झुंजार नेता
10मार्च2020
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

Monday, March 9, 2020

महिला दिन

आजची वात्रटिका
---------------------------------------
महिला दिन
तिच्या हार-तुऱ्यावर,
त्याचा डोळा होता.
गाय म्हणाली बैलाला,
हा तर गायपोळा होता.
तिचा हा गैरसमज,
आता तरी दूर व्हावा !
महिला सन्मानाचा,
वर्षभर पूर यावा !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7230
दैनिक झुंजार नेता
9मार्च2020

शॅडो कॅबिनेट

आजची वात्रटिका
---------------------------------------
शॅडो कॅबिनेट
आपण सत्तेत नसूनही,
सत्तेवर बसल्यासारखे वाटते.
हाती मंत्रीपद नसूनही,
ते हाती असल्यासारखे वाटते.
शॅडो कॅबिनेट संकल्पनेचा,
एक अर्थ हाच असतो !
खऱ्या मंत्रीमंडळावर,
खोट्या मंत्रीमंडळाचा वॉच असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5742
दैनिक पुण्यनगरी
9मार्च 2020

Sunday, March 8, 2020

वाटेकरी

आजची वात्रटिका
---------------------------------------
वाटेकरी
डिझेल म्हणाले पेट्रोलला,
स्वस्ताईचे काही खरे दिसत नाही.
कितीही बसवले तरी,
लोकांचे बजेट बसत नाही.
तुही आणि मीही
दोघेही घाटेकरी आहोत !
जनतेच्या वाईट अवस्थेचे,
आपण दोघेही वाटेकरी आहोत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

निसर्गाचा शाप

आजची वात्रटिका
---------------------------------------
निसर्गाचा शाप
जुन्यावर उपाय शोधताच,
नवा रोग हजर आहे.
शर्यत सुरूच असल्याचा,
निसर्गाकडून बझर आहे.
प्रत्येक नवा रोग,
जुन्या रोगाचा बाप आहे !
जणू मानवाच्या अमरत्वाला,
निसर्गाचा शाप आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7229
दैनिक झुंजार नेता

कोरोना व्हायरसचा संवाद

आजची वात्रटिका
---------------------------------------
कोरोना व्हायरसचा संवाद
मिसेस कोरोना म्हणाल्या
मिस्टर कोरोनाला.
काहीच अर्थ नाही,
तुमच्या डरोना डरोनाला.
जागतिक महिला दिनावर
तुमची छाया आहे.
पुन्हा तुम्हीच म्हणाल,
काय ही बया आहे?
मिस्टर कोरोना उत्तरले,
तसले काही कनेक्शन नाही !
माणूस नावाच्या व्हायरसचे,
अजून तरी,
आपल्याला इन्फेक्शन नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269

Saturday, March 7, 2020

महिला दिनाचे संकल्प

आठ्वणीतील
वात्रटिका
----------------------------------------
महिला दिनाचे संकल्प
आयांनी संकल्प करावा
पून्हा खून करणार नाही.
कुणाच्या सांगण्यावरून
गर्भातल्या लेकी मारणार नाही.
बायकांनी ठरविले पाहिजे
नवर्‍याला छळणार नाही.
सासवांनीही ठरविले पाहिजे
सूनांना जाळणार नाही.
हक्कांपेक्षा जबाबदारी
जोपर्यंत कळणार नाही !
महिला दिनाचे औचित्य
तोपर्यंत कळणार नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-2163
दैनिक पुण्यनगरी
8मार्च 2010
--------------------------------------

कोरोना रिपोर्ट

आजची वात्रटिका
----------------------------------------
कोरोना रिपोर्ट
कुणाच्या व्यवसायाला संधी,
कुणाच्या व्यवसायावर गदा आहे.
तरीही आपल्या भारतावर,
कोरोना व्हायरस फिदा आहे.
आपल्यावर कोरोनाने फिदा होणे,
अगदीच रास्त आहे !
अफवांच्या व्हायरसचा वेग,
आपल्याकडे सर्वात जास्त आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5740
दैनिक पुण्यनगरी
7मार्च 2020

Friday, March 6, 2020

टंचाई नावाची संधी

आजची वात्रटिका
----------------------------------------
टंचाई नावाची संधी
लायकांची टंचाई झाली की,
नालायकांची चंदी असते.
लायकांची अवहेलनाही,
नालायकांसाठी संधी असते.
लायकांच्या जागा मग,
नालायक आटवू लागतात !
आपल्या कर्तृत्वाच्या अफवा,
सोदाहरण उठवू लागतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7228
दैनिक झुंजार नेता
6मार्च2020

छुपे शत्रूत्व

आजची वात्रटिका
----------------------------------------
छुपे शत्रूत्व
उघड शत्रू परवडले,
छुपे शत्रू घातकी असतात.
जेवढे दिसतात पुण्यवान,
तेवढे ते पातकी असतात
रोज नवे जाळे,
ते मित्रांभोवती टाकत असतात !
इतरांना पापी ठरवून
आपले पाप झाकत असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5739
दैनिक पुण्यनगरी
6मार्च 2020

Thursday, March 5, 2020

इन्फेक्शन

आजची वात्रटिका
----------------------------------------
इन्फेक्शन
मी म्हणालो,
कोरोना ?
ती म्हणाली,
डरोना.
मला आणि तिला,
वेगवेगळी बाधा !
ज्याला ना कळाले,
त्याने मास्क शोधा !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7227
दैनिक झुंजार नेता
5मार्च2020

बिग न्यूज

आजची वात्रटिका
----------------------------------------
बिग न्यूज
वृत्तपत्रात छोट्या तर,
न्यूज चॅनलवर मोठ्या असतात.
बातम्या कमी अन,
जास्तीत जास्त कोट्या असतात.
छोट्या छोट्या वातम्यांनाही,
मोठे न्यूज व्हॅल्यू असते !
ज्या पाहिल्यावर कळते,
ती बातमी नसतेच
ते तर बातमीचे पिल्लू असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5736
दैनिक पुण्यनगरी
5मार्च 2020

Wednesday, March 4, 2020

अर्पण पत्रिका

आजची वात्रटिका
----------------------------------------
अर्पण पत्रिका
सोशल मीडियाच्या एक्झिटची
बातमीसुद्धा फेक निघाली.
तिथून रामराम करण्यामागेही,
एक ग्यानबाची मेख निघाली.
जिथे स्त्रीशक्तीचा सन्मान होतो,
त्याच घराला घरपण आहे !
घरचे राहू द्या,
बाहेरच्यांना अकाऊंट अर्पण आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7226
दैनिक झुंजार नेता
4मार्च2020

चोर ते चोर....

आजची वात्रटिका
----------------------------------------
चोर ते चोर....
नवी पिढी टेक्नोसॅव्ही आहे,
हे चांगलेच पटू लागले.
आजकाल परीक्षेचे पेपरही,
मोबाईलद्वारे फुटू लागले.
मोबाईल जमाना आहे,
मोबाईल कॉप्या आहेत.
अभ्यासाशिवाय ह्या गोष्टी,
भन्नाट आणि सोप्या आहेत.
नव्या पिढीची,जुन्या पिढीवर,
तांत्रिक शिरजोरी आहे !
पण नव्या पिढीला सांगा,
शेवटी चोरी ती चोरी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5735
दैनिक पुण्यनगरी
4मार्च 2020

Tuesday, March 3, 2020

ओम 'नमो' शिवाय....

आजची वात्रटिका
----------------------------------------
ओम 'नमो' शिवाय....
नको नको ते प्रश्न,
आता लोकांना पडणार आहेत.
पंतप्रधान नरेंद मोदी म्हणे,
सोशल मीडिया सोडणार आहेत.
कुणाचा विश्वास बसणार नाही,
कुणाचा विश्वास बसू शकतो !
मोबाईल डेटा महागल्याचा,
हा दुष्परिणाम असू शकतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7225
दैनिक झुंजार नेता
3मार्च2020

मिसगाईड

आजची वात्रटिका
----------------------------------------
मिसगाईड
कुणी टाकतोय गुगली ,
कुणाचा चेंडू वाईड आहे.
सामान्य माणूस मात्र,
सगळीकडून मिसगाईड आहे.
आपण मिसगाईड झालोय,
हे रस्ता चुकल्यावर कळले जाते !
संधीचा फायदा घेऊन,
बरोबर राजकारण खेळले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5734
दैनिक पुण्यनगरी
3मार्च 2020

Monday, March 2, 2020

कडवे सत्य

आजची वात्रटिका
----------------------------------------
कडवे सत्य
तुम्ही पुरस्कार लाटा,
तिरस्काराचा वाटा मी घेतो.
तुमचे पुण्य तुम्हाला लखलाभ,
पापाचा वाटेकरी मी होतो.
आमचे लिहिणे आणि बोलणे,
तुमच्यासाठी नेहमीच कटू आहे !
तुम्ही पाळलेले पोपट,
तुमचे बोलणेही मिठू मिठू आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7224
दैनिक झुंजार नेता
2मार्च2020

नकट्यांच्या कुरघोड्या

आजची वात्रटिका
----------------------------------------
नकट्यांच्या कुरघोड्या
आयाराम आणि गयाराम
एकमेकांची उडवू लागले.
आपली नाकाला गुंडाळून,
एकमेकांना चिडवू लागले.
एकमेकांना चिडवायचे,
नकट्यांना कुठे हक्क आहेत ?
नकट्यांच्या कुरघोड्या बघून,
सगळे नाकवाले थक्क आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5733
दैनिक पुण्यनगरी
2मार्च 2020

Sunday, March 1, 2020

नम्रतेचे दावे

आजची वात्रटिका
----------------------------------------
नम्रतेचे दावे
तुम्ही लोकानुनय केला की,
तुम्हांला लोकप्रिय म्हटले जाते.
लोकांच्या विरोधात गेले की,
तुम्हांला ताठ बांबू म्हटले जाते.
लोकांना ताठ बांबू नकोत,
त्यांना लव्हाळे हवे असतात !
लोकांसमोर कचाकचा वाकले की,
तुमच्या नम्रतेचे दावे असतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7223
दैनिक झुंजार नेता
1मार्च2020

असून अडचण..

आजची वात्रटिका
----------------------------------------
असून अडचण....
पाच दिवसांच्या आठवड्याची,
कुटूंबियांना कटकट वाटू लागली.
सरकारी कर्मचाऱ्यांची हौस,
घरच्या कटकटीमुळे फिटू लागली.
आठवड्यात एकच सुट्टी,
एवढेच काय ते पुरे होते !
वैतागलेल्या कुटुंबियांची चर्चा,
सहा दिवस आमचे हिटलर
ऑफिसात होते तेच बरे होते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5732
दैनिक पुण्यनगरी
1मार्च 2020

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...