Thursday, August 6, 2020

हे राम !

आजची वात्रटिका
----------------------------


हे राम !

ज्यांना मिश्या आवडतात त्यांना,
त्या पिळण्याचे वाढीव काम आहे.
कुणा-कुणाला वाटत असते,
नेमका मिश्यातच काय राम आहे?

जसे कुणा-कुणाला वाटते,
केवळ मिश्यात काय राम आहे?
तसे मिश्यातच राम असावा,
या मतावर कुणी कुणी ठाम आहे !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5880
दैनिक पुण्यनगरी
5ऑगस्ट2020
-------------------------------------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा

https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------
विशेष सूचना-माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी.जे वात्रटिका शेअर करीत आहेत त्यांचे विशेष आभार

-सूर्यकांत डोळसे
5ऑगस्ट2020

Tuesday, August 4, 2020

विक्रमी वाटचाल

विक्रमी वाटचाल

रोजच आपला विळखा,
कोरोना वाढीत चालला आहे.
कालचे आपले विक्रम,
कोरोना मोडीत चालला आहे.

कोरोना झाला आक्रमक,
आपला बचावत्मक पवित्रा आहे !
आजतरी बचाव एके बचाव,
हाती एवढीच एक मात्रा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7364
दैनिक झुंजार नेता
4ऑगस्ट2020

कोरोना टाईम

आजची वात्रटिका
----------------------------

कोरोना टाईम

आपले ते सर्दी-पडसे,
लोकांचा तो कोरोना आहे.
लोकांवर संशय घेणे,
हासुद्धा मोठा गुन्हा आहे.

इकडे लॉक डाऊन,
तिकडे क्वारंटाईन आहे !
तोंड दाखवले तर,
त्याचासुद्धा फाईन आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5879
दैनिक पुण्यनगरी
4ऑगस्ट2020


Monday, August 3, 2020

कायद्याचा मसूदा

आजची वात्रटिका
----------------------------

कायद्याचा मसूदा

मसूदा हा मसूदा असतो,
कायदा हा कायदा असतो.
मसुद्याचाच कायदा होईल,
याचा कुठे वायदा असतो?

शिफारसी ठोकरल्या जातात,
शिफारसी नाकारल्या जातात !
ज्या बाबी सोयीच्या वाटतात,
त्या त्या स्विकारल्या जातात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7361
दैनिक झुंजार नेता
1ऑगस्ट2020

जातीवाचक शब्द

आजची वात्रटिका
----------------------------

जातीवाचक शब्द

रोज नव नव्या विषाची,
मना-मनामध्ये पेर आहे.
जातीवाचक शब्दांची,
भाषे-भाषेमध्ये भर आहे.

शब्द जातीवाचक आहेत,
शब्द जातीसूचक आहेत !
शब्द जेवढे बोचक,
तेवढेच शब्द खोचक आहेत !

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7363
दैनिक झुंजार नेता
3ऑगस्ट2020

कोरोना चढाई

आजची वात्रटिका
----------------------------

कोरोना चढाई

चढाई एके चढाई,
असे कोरोनाचे ठरले आहे.
किरकोळ -सारकोळा नंतर,
कोरोना योद्ध्यांनाच घेरले आहे.

सुटता सुटता आवळत जातोय,
तो कोरोनाचा तिढा आहे !
आता तर देशाच्या गृहमंत्र्यानाच,
कोरोनाचा वेढा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5878
दैनिक पुण्यनगरी
3ऑगस्ट2020
-------------------------------------------
#कोरोना

Sunday, August 2, 2020

मुलाखत तंत्र

आजची वात्रटिका
----------------------------

मुलाखत तंत्र

बातम्या बनवा,बातम्या पेरा,
हा जसा भांडवली मंत्र आहे.
तसा पूर्वलिखित मुलाखती,
हेही मीडियाचेच तंत्र आहे.

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी,
यातसुद्धा तंत्र-मंत्र आहे !
एवढे ताळतंत्र सुटते की,
जणू प्यालेले संत्र आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7362
दैनिक झुंजार नेता
2ऑगस्ट2020

वृत्तनामा

आजची वात्रटिका
----------------------------

वृत्तनामा

रोज वृत्तवाहिन्यांच्या बातम्यात,
मराठी भाषेचे वांगे वासते आहे.
कर्ता, कर्म आणि क्रियापद,
कुठल्या कुठे जाऊन बसते आहे.

तरीही मराठी भाषेचे;
काही बिघडत नाही,
आमचा विश्वास आणि दावा आहे !
एकवेळ अशुद्ध समजू शकतो.
पण बेशुद्धतेवर उपाय हवा आहे!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5876
दैनिक पुण्यनगरी
1ऑगस्ट2020

कोरोनाच्या छायेत

आजची वात्रटिका
----------------------------

कोरोनाच्या छायेत

सॅनिटायझरने हात पेताड,
नरड्याचीही जळजळ आहे.
एका कोरोनाच्या त्रासाची,
अंगोपांगाला झळ आहे.

तोंडाची झाली नाकेबंदी,
जुलमी तर डोळे आहेत.
फुप्फुसाच्या काळजीने,
पायालाही गोळे आहेत.

डोके काही चालत नाही,
मेंदूही बधीर झाला आहे !
कोरोनाच्या मुक्तीसाती,
प्रत्येकजण अधीर झाला आहे!!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5877
दैनिक पुण्यनगरी
2ऑगस्ट2020
-------------------------------------
#कोरोना

Saturday, August 1, 2020

उदात्तीकरणाची चाल

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
------------------------------

उदात्तीकरणाची चाल
नको ते झाकण्यासाठी
हवे ते पुढे केले जाते.
बिनडोक गाढवांनाही
चक्क घोडे केले जाते.
असत्याच्या गदारोळात
सत्य बिचारे चिमटले जाते!
उदात्तीकरणाच्या डावपेचात
आपलेच घोडे दामटले जाते!!
-सूर्यकांत डॊळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------
चिमटा-4450
दैनिक पुण्यनगरी
1 ऑगस्ट 2016

दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...