Thursday, April 11, 2024

दैनिक वात्रटिका11एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -309वा

दैनिक वात्रटिका
11एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -309वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

झुक झुक झुक झुक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

झुक झुक झुक झुक...

आलट्या पलट्या उलट्या बघून,
कुणीच आश्चर्यचकित होऊ नका.
आता तर कुणीही कुणाचे,
व्हिडिओ - बिडिओ लावू नका.

काल वेगळे ऑडिओ होते,
आज मात्र वेगळेच ऑडिओ आहेत.
लाव रे तो व्हिडिओ.. मालिकेत,
आता तर त्यांचेही व्हिडिओ आहेत.

लोकसभेच्या प्रचारात,
चक्क विधानसभेचे फर्मान आहे !
महाराष्ट्राला चक्रावून टाकणारे,
धक्कादायक असे नवनिर्माण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8530
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11एप्रिल2024
 

Wednesday, April 10, 2024

दैनिक वात्रटिका10एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -308वा


दैनिक वात्रटिका
10एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -308वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

बिनशर्त पाठिंबा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

बिनशर्त पाठिंबा

प्रत्येकाच्या दिलेल्या पाठिंब्याचे,
जसे वेगवेगळे अर्थ असतात.
तसे काही पाठिंबे बिनशर्त तर,
काही पाठिंबे सशर्त असतात.

सशर्तच्या अटी उघड तर,
बिनशर्तच्या अटी छुप्या असतात.
बिनशर्तपेक्षा सशर्तच्या अटी,
पाळण्यासाठीही सोप्या असतात.

सशर्तपेक्षा बिनशर्तपाठिंबा,
अधिकच धोकादायक असतो !
वरवर निरपेक्ष वाटला तरी,
तोच चिंतेच्या लायक असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8529
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10 एप्रिल2024
 

Tuesday, April 9, 2024

दैनिक वात्रटिका9एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -307वा


दैनिक वात्रटिका
9एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -307वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

असली नकलीचा संभ्रम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

असली नकलीचा संभ्रम

ज्याने त्याने आपली अक्कल,
केव्हाच गहाण टाकली आहे.
त्यामुळेच ओळखू येईना,
कोण असली?कोण नकली आहे?

जे जे असली आहेत,
त्यांनाच नकली ठरवत आहेत.
प्रत्यक्षात नकली मात्र,
असली म्हणून मिरवत आहेत.

हा भ्रम मात्र कायम आहे,
कोण चुकीचे ? कोण रास्त आहे ?
असलीपेक्षा नकलीच्याच,
पाठीराख्यांची संख्या जास्त आहे!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8528
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9 एप्रिल2024
 

Monday, April 8, 2024

दैनिक वात्रटिका8एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -306वा


दैनिक वात्रटिका
8एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -306वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

धोक्याचे वळण..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

-------------------------

धोक्याचे वळण

कळत नाही राजकारणाचा,
नेमका काय विचार आहे?
कालपर्यंत एकाचा प्रचार,
आज दुसऱ्याचाच प्रचार आहे.

दिवसा-दिवसाला राजकारण,
वेगवेगळी पलटी मारते आहे.
लोकांनाच गिल्टी वाटावे,
एवढे राजकारण कल्टी मारते आहे.

राजकारणाचे कुळ आणि,
राजकारण्यांना मूळ विचारू नये !
म्हणूनच शहाण्या माणसाने,
राजकारणाचे खुळ आचारू नये !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8527
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8 एप्रिल2024

Sunday, April 7, 2024

दैनिक वात्रटिका7एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -305वा


दैनिक वात्रटिका
7एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -305वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

जाहीरनाम्यांची कॉपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जाहीरनाम्यांची कॉपी

काही यांचे;काही त्यांचे,
निवडणूक मुद्दे ढापले जातात.
निवडणुक औपचारिकता म्हणून,
जाहीरनामे छापले जातात.

सामान्य जनतेच्या पदरात,
जाहीरनाम्याची ठेव असते.
प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला,
आपले एक वेगळे नाव असते.

निवडणूक जाहीरनामे म्हणजे,
सामान्य जनतेला टोप्या वाटतात !
मागच्या जाहीरनाम्याच्या,
सुधारित अशा कॉप्या वाटतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8526
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7 एप्रिल2024
 

Saturday, April 6, 2024

दैनिक वात्रटिका6एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -304वा पाने -45

दैनिक वात्रटिका
6एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -304वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

विसंगती...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

विसंगती

राजकारणात असे वाटत नाही,
सगळ्यांचेच इरादे नेक आहेत.
जसे आपल्या विरोधकांना आहेत,
तसे मित्रांचे मित्रांनाही चेक आहेत.

राजकारण्यांची सगळीजमातच ,
जेवढीअविश्वासू तेवढी भित्री असते.
जसा असतो त्यांचा स्वभाव,
अगदी तशीच त्यांची मैत्री असते.

राजकीय मित्रांचे आणि शत्रूंचेही,
राजकीय मैत्रीचे आव असतात !
पोटामध्ये शत्रुत्वाचे तर,
ओठावरती मैत्रीचे भाव असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8525
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
6 एप्रिल2024
 

Friday, April 5, 2024

दैनिक वात्रटिका5एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -303वा

दैनिक वात्रटिका
5एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -303वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/1ALA8uK8TfJpWz0E7mJBA-0ppVWLtDaQB/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे

 

निवडणूकनामा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

निवडणूकनामा

निवडणुकीच्या लढाया,
जशा आर या पार होतात.
तशा जाती-धर्माच्या प्रचारावर,
निवडणुका स्वार होतात.

प्रासंगिक मुद्दे तापले जाऊन,
मूलभूत मुद्देही गार होतात.
खाण्या-पिण्याच्या चंगळीवर,
निवडणुका स्वार होतात.

मतदानाच्या पवित्र हक्काचे,
उघडपणे बाजार होतात !
नोटांवर आणि लाटांवर,
निवडणुका स्वार होतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8524
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5 एप्रिल2024
 

Thursday, April 4, 2024

दैनिक वात्रटिका4एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -302वा


दैनिक वात्रटिका
4एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -302वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

मनोमिलन ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मनोमिलन

नको त्यांच्या;नको त्यांच्याशी,
आज मिठावरती मिठ्या आहेत.
वर पुन्हा उमेदवार म्हणून,
नटांच्या सोबतीला नट्या आहेत.

कुणी आहेत ' स्टार ' प्रचारिका,
कुणी कुणी 'स्टार ' प्रचारक आहेत.
झगमगटाला भुललेले,
लोक तरी कुठे विचारक आहेत ?

राजकारण आणि सिनेमाचे,
स्वार्थी असे मनोमिलन आहे !
जनतेसाठी हिरो कोणीच नाही,
सगळेच फक्त व्हिलन आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8523
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4 एप्रिल2024
 

Wednesday, April 3, 2024

दैनिक वात्रटिका3एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -301वा


दैनिक वात्रटिका
3एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -301वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

आघाडी आणि युती धर्म...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आघाडी आणि युती धर्म

आघाडीचा आणि युतीचा,
म्हणे एक धर्म असतो.
तो कधीतरी तोडावा लागतो,
हा नियमही कन्फर्म असतो.

आघाडी आणि युतीचा धर्म,
जमेल तेवढाच पाळला जातो.
जेव्हा झेपत नाही तेव्हा,
आघाडीचा धर्म टाळला जातो.

आपण सोडून दुसऱ्याला,
धर्माचा दाखला दिला जातो !
आघाडी आणि युतीचा धर्म,
सोयीनुसार भ्रष्ट केला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8522
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
 

Tuesday, April 2, 2024

दैनिक वात्रटिका2एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -300वा


दैनिक वात्रटिका
2एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -300वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
https://drive.google.com/file/d/18IJgwn_YfeS-SUFxwNQBOnr4yUOymNb4/view?usp=drivesdk
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

मुळव्याधी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

मुळव्याधी

जैसी करनी वैसी भरणी,
ज्याचे त्याला फेडावे लागत आहे.
विरोधकांशी लढण्या अगोदर,
स्वकीयांशीच लढावी लागत आहे.

ज्याला त्याला वाटते,
आपलाच पक्ष इतरांपेक्षा बरा आहे.
कशात काय?फाटक्यात पाय,
सगळीकडे सारखीच तऱ्हा आहे.

एक गोष्ट लक्षात आली का?
जी अत्यंत सरळ आणि साधी आहे !
नाराजी म्हणजे,
राजकारणातली मूळ -व्याधी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8521
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 एप्रिल2024

Monday, April 1, 2024

दैनिक वात्रटिका1एप्रिल2024....वर्ष- तिसरे..अंक -299वा


दैनिक वात्रटिका
1एप्रिल2024....वर्ष- तिसरे..
अंक -299वा 
पाने -45
अंक डाऊनलोड लिंक -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे
 

नात्या - गोत्याचे राजकारण..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नात्या - गोत्याचे राजकारण

कोणत्याही निवडणुकीची तिकिटे,
जशी घरात तशी नात्यात असतात.
राजकीय अति महत्वकांक्षामुळे,
त्यांची नातीसुद्धा गोत्यात असतात.

इकडून जो नाट्य प्रयोग केला जातो,
तिकडूनही अगदी तोच केला जातो.
नाती गोत्यात आली की,
प्रचाराला भावनिक टच दिला जातो.

कुणी कुणाला गीता सांगायची?
सगळा राजकीय गोंधळ होऊन जातो !
निवडणुकीच्या कौटुंबिक महाभारतात,
लोकांचा मात्र अर्जुन होऊन जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8520
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 एप्रिल2024
 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...