Thursday, April 4, 2024

मनोमिलन ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

मनोमिलन

नको त्यांच्या;नको त्यांच्याशी,
आज मिठावरती मिठ्या आहेत.
वर पुन्हा उमेदवार म्हणून,
नटांच्या सोबतीला नट्या आहेत.

कुणी आहेत ' स्टार ' प्रचारिका,
कुणी कुणी 'स्टार ' प्रचारक आहेत.
झगमगटाला भुललेले,
लोक तरी कुठे विचारक आहेत ?

राजकारण आणि सिनेमाचे,
स्वार्थी असे मनोमिलन आहे !
जनतेसाठी हिरो कोणीच नाही,
सगळेच फक्त व्हिलन आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8523
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
4 एप्रिल2024
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...