Sunday, April 28, 2024

एनर्जी स्टॉक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

एनर्जी स्टॉक

उद्याच्या आशेवरती,
सगळेचजण जगत आहेत.
म्हणूनच लोकसभेकडे,
कुणी तटस्थपणे बघत आहेत.

विधानसभेच्या आशेपोटी,
लोकसभेचे द्राक्ष आंबट आहेत.
लोकांच्या चर्चासुद्धा,
जास्तच आंबट चिंबट आहेत.

कुणा-कुणाच्या भविष्यावर,
आजच्या पुरते तरी लॉक आहे!
म्हणे विधानसभेसाठी,
त्यांचा एनर्जी स्टॉक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8547
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 284 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 284 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1GpzS1tRMl3s8XGdtqK4fI...