Saturday, April 27, 2024

गद्दारीच्या व्याख्या ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गद्दारीच्या व्याख्या

आपला तो बाब्या दुसऱ्याचे ते कार्टे,
या गोष्टी अगदी पक्क्या आहेत.
ज्याच्या त्याच्या गद्दारीच्या,
आपल्या सोयीनुसार व्याख्या आहेत.

आजकाल कुऱ्हाडीचे दांडे,
आपल्याच गोताचे काळ आहेत.
त्यांचेच तर एकमेकांवरती,
गद्दारीचे रोखठोक आळ आहेत.

आता हे असेच होत राहणार,
ह्या गोष्टी गृहीत धराव्या लागतील !
गद्दारीच्या नव्या नव्या व्याख्या,
जनतेला तयार कराव्या लागतील !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8546
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 284 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 284 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1GpzS1tRMl3s8XGdtqK4fI...