Sunday, April 21, 2024

उमेदवारीचा जुगार ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारीचा जुगार

कुणा कुणाचे गेले बुक,
कुणाची रम्मीच आरार आहे.
कुणाची झाली टांगा पलटी,
कुणाचे घोडेच फरार आहे.

हाती हुकूमाचे पत्ते असूनही,
कुणी नाविलाजाने पॅक आहे.
जे जे गुलाम;आदेशाला सलाम,
त्यांचे तर डोकेच क्रॅक आहे.

ज्यांची पानेच उलटी पडली,
त्यांची तर चक्क माघार आहे!
पुन्हा नव्याने सिद्ध झाले,
निवडणूक पक्का जुगार आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8540
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 284 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 284 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1GpzS1tRMl3s8XGdtqK4fI...