Tuesday, April 30, 2024

मामला गडबड हैं..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

मामला गडबड हैं..

जाहिराती आदळू लागल्या,
प्रचार सभा खिदळू लागल्या.
आरोप आणि प्रत्यारोपाच्या,
पुष्पमालाही उधळू लागल्या.

कुणी रेटून बोलतो आहे,
कुणी नटून थटून बोलतो आहे.
कुणी आधीच विझलेला,
कुणी कुणी पेटून बोलतो आहे.

कुणाला विजय दिसतो आहे,
कुणाला पराभव दिसतो आहे !
मतदार राजा मात्र,
स्वतःच स्वतःवर हसतो आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8549
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30एप्रिल2024
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...