Friday, April 26, 2024

दबाव तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

दबाव तंत्र

एकमेका साह्य करू..
जरी हा मंत्र चालू आहे.
तरीही मित्रांचे मित्रांवरती,
दबाव तंत्र चालू आहे.

जसे मित्रांचेच मित्रांवरती,
पुन्हा पुन्हा दबाव आहेत.
प्रत्येक तिकिटा तिकीटावर,
दबाव तंत्रांचे प्रभाव आहे.

कुणाचा चालला तळतळाट,
कुणाचा रुसवा फुगवा आहे !
मित्रांचा मित्रांपुढे,
उमेदवारीचा जोगवा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8545
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26एप्रिल2024
 

No comments:

daily vatratika.. 24Sept2026