Monday, April 1, 2024

नात्या - गोत्याचे राजकारण..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

नात्या - गोत्याचे राजकारण

कोणत्याही निवडणुकीची तिकिटे,
जशी घरात तशी नात्यात असतात.
राजकीय अति महत्वकांक्षामुळे,
त्यांची नातीसुद्धा गोत्यात असतात.

इकडून जो नाट्य प्रयोग केला जातो,
तिकडूनही अगदी तोच केला जातो.
नाती गोत्यात आली की,
प्रचाराला भावनिक टच दिला जातो.

कुणी कुणाला गीता सांगायची?
सगळा राजकीय गोंधळ होऊन जातो !
निवडणुकीच्या कौटुंबिक महाभारतात,
लोकांचा मात्र अर्जुन होऊन जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8520
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 301वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 31मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 301वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1S4SAD0tMR_eqzmeUqaS...