Friday, April 19, 2024

गोड अपघात...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

गोड अपघात

उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये
परस्परांवरती मात आहे.
कुणाकुणाची उमेदवारी,
हा निव्वळ अपघात आहे.

कुणासाठी गोड आहे,
कुणासाठी अपघात कडू आहे.
कुठे कुठेतर विरोधात,
चक्क आपलाच भिडू आहे.

कुठे मैत्रीपूर्ण लढती,
कुठे लुटूपुटूच्या लढाया आहेत !
काटे की टक्कर असल्याच्या,
सगळीकडून बढाया आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8538
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
19 एप्रिल2024
 

No comments:

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...