Saturday, April 13, 2024

फजितवाडा ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

फजितवाडा

आरोप आणि प्रत्यारोपांचा,
एकच ठोका चालू आहे.
आपल्याच भूतकाळावर,
वर्तमानाची टीका चालू आहे.

काल ज्यांचे कौतुक केले,
त्यांच्यावरच आज टीका आहे.
काल ज्यांच्यावर टीका केली,
आज त्यांच्या कौतुकाचा ठेका आहे.

वर्तमान आणि भूतकाळ बघून,
सगळ्यांवरती भविष्य हसते आहे !
सगळ्यांची चाललेली फजिती,
त्याला बरोबर दिसते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8532
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
13 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...