Thursday, April 11, 2024

झुक झुक झुक झुक...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

झुक झुक झुक झुक...

आलट्या पलट्या उलट्या बघून,
कुणीच आश्चर्यचकित होऊ नका.
आता तर कुणीही कुणाचे,
व्हिडिओ - बिडिओ लावू नका.

काल वेगळे ऑडिओ होते,
आज मात्र वेगळेच ऑडिओ आहेत.
लाव रे तो व्हिडिओ.. मालिकेत,
आता तर त्यांचेही व्हिडिओ आहेत.

लोकसभेच्या प्रचारात,
चक्क विधानसभेचे फर्मान आहे !
महाराष्ट्राला चक्रावून टाकणारे,
धक्कादायक असे नवनिर्माण आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8530
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...