Monday, April 15, 2024

तिकिटांचा सुकाळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

तिकिटांचा सुकाळ

सगळ्याच राजकीय पक्षांचे,
टाक्यावर टाके ढिले आहेत.
बंडखोरी वाढण्याचे कारण,
पर्यायच पर्याय खुले आहेत.

इकडून नाही तर तिकडून,
उमेदवारीची पक्की खात्री आहे.
ज्याला आधीच दिले होते,
त्याच्या तिकिटालाही कात्री आहे.

ज्याचे तिकीट कापले गेले,
त्यालासुद्धा काही वाटत नाही !
खरी गोम अशी की,
पक्ष पक्षाला उमेदवार भेटत नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8534
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 284 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 284 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1GpzS1tRMl3s8XGdtqK4fI...