Monday, April 29, 2024

उपद्रव मूल्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उपद्रव मूल्य

उपयोगीता मूल्य दाखविता येत नाही,
तेच उपद्रव मूल्य दाखवायला लागले.
आपल्या उपद्रव मूल्याच्या कंड्या,
तेच जोर जोराने पिकवायला लागले.

उपद्रवमूल्य दाखविणारांची,
भूमिकाच अगदी टोकाची आहे.
त्यांनाही माहिती असते,
झाकली मूठ किती लाखाची आहे?

उपयोगीता मूल्यापेक्षाही,
उपद्रव मूल्याचा गाजावाजाअसतो !
निसटत्या पराभवामागे,
उपद्रव्य मूल्यावाल्याचा भेजा असतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8548
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका15मे2024....वर्ष- तिसरे..अंक -352वा

 दैनिक वात्रटिका 15मे2024....वर्ष- तिसरे.. अंक -352वा  पाने -45 अंक डाऊनलोड लिंक - https://drive.google.com/file/d/1_pZea66DTGTEqK368mGUBNMY...