Wednesday, April 17, 2024

परिस्थितीजन्य पुरावे..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

परिस्थितीजन्य पुरावे

उतलेल्या आणि मातलेल्यांसाठी,
अगदी अनुकूल असा काळ आहे.
बंडोबा,थंडोबा आणि कंडोबांच्या,
गळ्यात उमेदवारीची माळ आहे.

गरजवंतांना अक्कल नसते,
सगळे काही असेच झाले आहे.
बंडोबा,थंडोबा आणि कंडोबांकडून,
आपल्या लोकशाहीचे चांगभले आहे.

जे निवडणुकीला उभे राहिले,
त्यातलेच कुणीतरी निवडून येतील !
उद्या हेच बंडोबा थंडोबा आणि कांडोबा,
एकमेकांना जाहीर पाठिंबा देतील !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8536
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...