Sunday, April 7, 2024

जाहीरनाम्यांची कॉपी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

जाहीरनाम्यांची कॉपी

काही यांचे;काही त्यांचे,
निवडणूक मुद्दे ढापले जातात.
निवडणुक औपचारिकता म्हणून,
जाहीरनामे छापले जातात.

सामान्य जनतेच्या पदरात,
जाहीरनाम्याची ठेव असते.
प्रत्येकाच्या जाहीरनाम्याला,
आपले एक वेगळे नाव असते.

निवडणूक जाहीरनामे म्हणजे,
सामान्य जनतेला टोप्या वाटतात !
मागच्या जाहीरनाम्याच्या,
सुधारित अशा कॉप्या वाटतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8526
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7 एप्रिल2024
 

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...