Wednesday, April 3, 2024

आघाडी आणि युती धर्म...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------

आघाडी आणि युती धर्म

आघाडीचा आणि युतीचा,
म्हणे एक धर्म असतो.
तो कधीतरी तोडावा लागतो,
हा नियमही कन्फर्म असतो.

आघाडी आणि युतीचा धर्म,
जमेल तेवढाच पाळला जातो.
जेव्हा झेपत नाही तेव्हा,
आघाडीचा धर्म टाळला जातो.

आपण सोडून दुसऱ्याला,
धर्माचा दाखला दिला जातो !
आघाडी आणि युतीचा धर्म,
सोयीनुसार भ्रष्ट केला जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8522
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
 

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...