Tuesday, April 2, 2024

मुळव्याधी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

मुळव्याधी

जैसी करनी वैसी भरणी,
ज्याचे त्याला फेडावे लागत आहे.
विरोधकांशी लढण्या अगोदर,
स्वकीयांशीच लढावी लागत आहे.

ज्याला त्याला वाटते,
आपलाच पक्ष इतरांपेक्षा बरा आहे.
कशात काय?फाटक्यात पाय,
सगळीकडे सारखीच तऱ्हा आहे.

एक गोष्ट लक्षात आली का?
जी अत्यंत सरळ आणि साधी आहे !
नाराजी म्हणजे,
राजकारणातली मूळ -व्याधी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8521
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 एप्रिल2024

No comments:

दैनिक वात्रटिका l 18ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 140 वा l

दैनिक वात्रटिका l 18ऑक्टोबर2024  वर्ष- चौथे अंक - 140 वा l पाने -42 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1sHCeDmGYb-nx4c9aWPg...