Saturday, April 20, 2024

उमेदवारीचे मायाजाल...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारीचे मायाजाल

कोणत्याही निवडणुकीमध्ये,
एक चालूपणा नक्की केला जातो.
नाव सारखे असणारा उमेदवार,
आपल्या विरोधकांपुढे दिला जातो.

जसे नाम साधर्म्य शोधले जाते,
तसे चिन्ह साधर्म्यही शोधले जाते.
गोंधळात गोंधळाचे मायाजाल,
मतदारांवरती लादले जाते.

एका जातीचे; एका धर्माचे,
ही चाल तर नेहमीच खेळली जाते !
निवडणूक म्हणजे ना युद्ध ना प्रेम,
तरीही जनता याला भाळली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8539
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...