Thursday, April 18, 2024

संघटनेचे बळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संघटनेचे बळ

राजकीय पक्षांवाल्यांपेक्षा
संघटनावालेच जास्त फॉर्मत आहेत.
या नाहीतर त्या राजकीय पक्षांच्या,
उमेदवाऱ्या त्यांच्या कर्मात आहे.

जाती-धर्म,शिक्षणाबरोबरच,
शेतकरी संघटनावालेही त्यात आहेत.
बाकीचेही तुम्हीच ओळखू शकता,
उरलेले जे जे कोणी यात आहेत.

प्रत्येक संघटनेवाल्यांकडे,
आपले आपले हुकमी कार्ड आहे !
संघटनावाल्यांच्याच हातामध्ये,
प्रत्येक पक्षा-पक्षाचं नरडं आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8537
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025वर्ष- चौथेअंक - 284 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका l 13मार्च 2025 वर्ष- चौथे अंक - 284 वा l पाने -54 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1GpzS1tRMl3s8XGdtqK4fI...