Sunday, April 14, 2024

बालिशपणा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बालिशपणा

प्रत्येकाच्या सवाल जवाबाचे,
अगदी वेगळेच तर्कट आहे.
पोरकट असतात सवाल,
आणि जवाबही पोरकट आहे.

ते सवाल;तेच जवाब,
बघा सगळेच कसे बालिश आहे.
सगळे मटेरियल जुने,
वरून फक्त नवी पॉलिश आहे.

कुणाचा राजकीय कच्चेपणा आहे,
कुणाचा राजकीय बच्चेपणा आहे !
आपल्या लबाडीलाच म्हणतात,
हाच आमचा सच्चेपणा आहे !!


-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8533
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14 एप्रिल2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...