Monday, April 8, 2024
धोक्याचे वळण..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका
आजची वात्रटिका-------------------------
धोक्याचे वळण
कळत नाही राजकारणाचा,
नेमका काय विचार आहे?
कालपर्यंत एकाचा प्रचार,
आज दुसऱ्याचाच प्रचार आहे.
दिवसा-दिवसाला राजकारण,
वेगवेगळी पलटी मारते आहे.
लोकांनाच गिल्टी वाटावे,
एवढे राजकारण कल्टी मारते आहे.
राजकारणाचे कुळ आणि,
राजकारण्यांना मूळ विचारू नये !
म्हणूनच शहाण्या माणसाने,
राजकारणाचे खुळ आचारू नये !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8527
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8 एप्रिल2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
वात्रटिका : वर वर एक हलकाफुलका विनोदी काव्यप्रकार वाटत असला तरी केवळ विनोद निर्मिती हे वात्रटिकेचे एकच आणि अंतिम कार्य नाही. पश्चिमी ‘लिम्...

No comments:
Post a Comment