Friday, July 10, 2020

देवाक काळजी...

आजची वात्रटिका
----------------------------
देवाक काळजी...
कोरोनाच्या धक्केबाजीला,
आपण कुठे विसरू शकतो?
यावरही शिक्कामोर्तब झाले,
तो हवेतूनही पसरू शकतो.
जागतिक आरोग्य संघटनेचाही,
हवाई संसर्गाला हवाला आहे !
आता नास्तिकही म्हणू नयेत,
आपली काळजी देवाला आहे !
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5854
दैनिक पुण्यनगरी
10जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Thursday, July 9, 2020

अशास्त्रीय विचार

आजची वात्रटिका
------------------------------
अशास्त्रीय विचार
एखादा प्रश्नव मुळात,
आपल्या बौद्धिक सत्त्वाचा असतो.
अभ्यासक्रमातील एखादा धडा म्हणे,
कमी-अधिक महत्त्वाचा असतो.
फक्त एखादा धडाच नाही,
विषयलाही कमी लेखले जाते !
सुजाण नागरीक घडवायचे,
शास्त्रही अडगळीत टाकले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7338
दैनिक झुंजार नेता
9जुलै 2020

तहनामा

आजची वात्रटिका
----------------------------
तहनामा
राजकीय पक्षांतराचे,
कुणाला काहीच वाटत नाही.
बाटा-बाटी कालबाह्य झाली,
त्यामुळे कुणीच बाटत नाही.
जे पदरी पडतात,
ते पवित्र केले जातात !
राजकीय तह झाले की,
गुलाम परत दिले जातात !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5853
दैनिक पुण्यनगरी
9जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Wednesday, July 8, 2020

हवाई सफर

आजची वात्रटिका
----------------------------
हवाई सफर
कोरोनामुळे अगोदरच,
सगळी अफरातफर आहे.
तोपर्यंत नवी बातमी आली,
कोरोनाची हवाई सफर आहे.
कोरोनामुळे अगोदरच,
पळता भुई थोडी आहे !
कुणीतरी दिलासा द्यारे,
ही बातमी खरी नाही,
ही चक्क पुडी आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7337
दैनिक झुंजार नेता
8जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

संतापाचा भावार्थ

आजची वात्रटिका
----------------------------
संतापाचा भावार्थ
पेट्रोलकडे बघून,
डिझेलही पेटले आहे.
पेट्रोलच्या भावाला,
डिझेलने गाठले आहे.
कसला कसला कर,
ग्राहकाच्या गळी आहे !
आता पेट्रोल-डिझेल,
गाडीमध्ये नाही;
गाडीवर ओतायची पाळी आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5852
दैनिक पुण्यनगरी
8जुलै2020
--------------------------------
#कोरोना

Tuesday, July 7, 2020

टेक केअर

आजची वात्रटिका
----------------------------
टेक केअर
कोरोनाच्या व्हायरसचा,
एकच ठोकताळा आहे.
कोरोनाचा व्हायरस,
खूपच निमताळा आहे.
कोरोनाच्या निमित्ताला,
आयते कारण होवू नका !
उतावळेपणा दाखवून,
कोरोनाला निमंत्रण देऊ नका !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7336
दैनिक झुंजार नेता
7जुलै 2020
--------------------------------
#कोरोना

कोरोनाच्या नावानं..

आजची वात्रटिका
----------------------------
कोरोनाच्या नावानं..
जशी कोरोनाच्या संकटाची,
बाजार बसवाबसवी आहे.
तशी कोरोनाच्या नावावर,
लोकांची फसवाफसवी आहे.
फसवे असो वा बाजारबसवे,
त्यांची एकच नाळ आहे !
जिकडे तिकडे सुतक,
त्यांना मात्र सुगीचा काळ आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5851
दैनिक पुण्यनगरी
7जुलै2020
-----------------------------
#कोरोना

Monday, July 6, 2020

विरोधकांची धडाडी

आजची वात्रटिका
-----------------------------
विरोधकांची धडाडी
कालचे सत्ताधारी,
आज कडक भासू लागतात.
विरोधी बाकावर बसले की,
खरे धडाडीचे दिसू लागतात.
विरोधकांची धडाडी बघून,
लोकसुद्धा थक्क होतात !
जबाबदारीपेक्षाही श्रेष्ठ,
मागण्या आणि हक्क होतात !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7335
दैनिक झुंजार नेता
6जुलै 2020

राजकीय हंगाम

आजची वात्रटिका
------------------------------------
राजकीय हंगाम
कुणाची चिखलफेक चालू,
कुणाकडून मी..मी,तू..तू आहे.
राजकारणाचे असे नाही की,
त्याचा ठराविक एक ऋतू आहे?
ना देणे घेणे;ना सुख दुःख,
दुष्काळ वा सुकाळ असतो !
राजकारणाचा हंगाम तर,
बारा महिने तेरा त्रिकाळ असतो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5850
दैनिक पुण्यनगरी
6जुलै2020

Sunday, July 5, 2020

कॉमन अजेंडा

आजची वात्रटिका
------------------------------------
कॉमन अजेंडा
गोष्ट जशी गंभीर असते,
गोष्ट तशी 'फुट'कळ असते.
मित्राने मित्राचे घर फोडू नये,
अशी आपली अटकळ असते.
आपल्या राजकीय मैत्रीवर,
आपल्या हाताने धोंडा असतो !
कारण आणि राजकारण हे की,
पक्षवाढ हा कॉमन अजेंडा असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7334
दैनिक झुंजार नेता
5जुलै 2020

मोबाईल गुरु

आजची वात्रटिका
------------------------------------
मोबाईल गुरु
ऑनलाईन गुरू आहेत,
ऑनलाईन शिष्य आहेत.
कोरोनाच्या धास्तीने,
हीच मोबाईल दृष्य आहेत.
अकल्पित असा बदल,
गुरू-शिष्याच्या नात्यात आहे !
नाते चिरंजीव राहील,
पण शैक्षणिक वर्ष धोक्यात आहे!!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5849
दैनिक पुण्यनगरी
5जुलै2020

Saturday, July 4, 2020

गुरुत्वाकर्षण

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
------------------------------
गुरुत्वाकर्षण
गिर्हाईकांची गर्दी बघून,
वाट्टेल ते धंदे सुरु झाले.
ज्यांची शिष्य व्हायची
लायकी नाही,
असेसुद्धा गुरु झाले.
आपण कितीही डोळे उघडा,
शिष्याची गुरूवर भक्ती असते !
शिषयांचा वेडपटपणा,
गुरूंची गुरुत्वाकर्षण शक्ती असते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
चिमटा-3067
दैनिक पुण्यनगरी
3जुलै2012

पक्षीय धोरण

आजची वात्रटिका
------------------------------------
क्षीय धोरण
काही कार्यकर्ते रुजवले जातात,
काही कार्यकर्ते जोजवले जातात.
बंडाची भाषा करणारे,
डावपेच करून कुजवले जातात.
जो झिजला जातो,कुजला जायो
तो कार्यकर्त्यांचा त्याग असतो !
न्याय-अन्यायाचे एकच उत्तर,
तो पक्षीय धोरणाचा भाग असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7333
दैनिक झुंजार नेता
4जुलै 2020
आजची वात्रटिका
------------------------------------
चमत्कारिक बोधामृत
प्रबोधनाच्या नावाखाली,
थापा मारल्या जातात.
सगळ्या चमत्कारिक गोष्टी,
हळूच पेरल्या जातात.
तर्कहीन चमत्कार,
पुन्हा पुन्हा बोधले जातात !
पोटपूजेच्या साधनाबरोबर,
जुने डावही साधले जातात !
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5848
दैनिक पुण्यनगरी
4जुलै2020

Thursday, July 2, 2020

नेतृत्त्वाची जातकुळी

आजची वात्रटिका
------------------------------------
नेतृत्त्वाची जातकुळी
जातीयवादाचे चटके,
लोक रोज सोसायला लागले.
जाती-जातीचे नेतेच,
जातीयवाद रोज पोसायला लागले.
नेते दाखवित सुटतात,
त्यांना काळजी किती आहे?
जातीयवाद संपला तर.
त्यांना संपण्याची भीती आहे.
समाजहिताच्या आड दडलेला,
नेतृत्त्वाचा छुपा स्वार्थ असतो !
समाजहित साधले तरच,
कोणत्याही संघटनाला अर्थ असतो !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7331
दैनिक झुंजार नेता
2 जुलै 2020
--------------------------------
#कोरोना
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त निवडक
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
----------------------------------------
https://suryakantdolase.blogspot.com
विशेष सूचना-माझ्या वात्रटिकात काही आक्षेपार्ह वाटले तर माझ्या मूळ पोस्ट तपासाव्यात किंवा माझ्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून खात्री करावी
-सूर्यकांत डोळसे
2जुलै2020

कोरोनील

आजची वात्रटिका
---------------------------------

कोरोनील
कोरोनीलच्या शोधावरून
गदारोळ माजला आहे.
रोगाइतकाच विलाजही,
भरपूर गाजला आहे.
लोक मात्र औषधासाठी,
नको तेवढे त्रस्त आहेत !
योगायोगाने गुरू- शिष्य,
नेहमीच वादग्रस्त आहेत !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5846
दैनिक पुण्यनगरी
2जुलै2020
-----------------------------
----------------------------
#कोरोना

Wednesday, July 1, 2020

कोरोनाचे अभंग

आजची वात्रटिका
------------------------------------
कोरोनाचे अभंग
सगुण भक्ती
झाली निर्गुण ।
कोरोनाची कुणकुण,
कानोकानी ।। १।।
आवरली दिंडी,
आवरली वारी।
देवाचिया द्वारी,
मनोमन ।।२।।
टाळ आणि चिपळी,
झाले भजनात दंग।
कोरोनाचे अभंग,
ठायठायी ।।३।।
भक्त सारे भोळे,
कोरोना अट्टल।
आरोग्य विठ्ठल,
भजूयात ।।४।।
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7330
दैनिक झुंजार नेता
1जुलै 2020
----------------------------
#कोरोना

उपास-तपास

आ।ठ।व।णी।ती।ल
वा।त्र।टि।का
---------------------------
उपास-तपास
उपवासाच्या दिवशीच
नवनवे मेनू स्फूरू लागतात.
साबुदाण्याने उसळी मारताच
बिच्चारे चिप्स कुरकुरू लागतात.
वड्याचे तेल असे
वांग्यावरती काढले जाते !
नायलॉनच्या जाळीने
पुण्य पदरी पाडले जाते !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------------------
चिमटा-888
दैनिक पुण्यनगरी
25ऑगस्ट2006

ट्रेड मार्क

आजची वात्रटिका
---------------------------------------
ट्रेड मार्क
फोर व्हीलर आणि टू व्हिलरवर,
जाती धर्माचे चिन्ह असतात.
आपापल्या जाती-पातीचेच
संत त्यावरती प्रसन्न असतात.
जातीपातीचा उदोउदो,
जातीपातीचाच स्पार्क असतो !
श्रद्धा आणि भक्तीपेक्षाही,
तो जाती-धर्माचा ट्रेडमार्क असतो !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5845
दैनिक पुण्यनगरी
1जुलैन2020
--------------------------------------
#कोरोना

Tuesday, June 30, 2020

चमत्कार... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठीत पत्रिका मराठी वात्रटिका

आठवणीतील
वात्रटिका
----------------------------------
चमत्कार
लेकरांच्या प्रेमापोटी,
भलेभले खुळे होतात.
राजकारणात दुधी दात
अचानक 'सुळे' होतात.
बिचाऱ्या लोकशाहीवर,
घराणेशाहीचा तोरा आहे !
'मुलगा मुलगी एकसमान'
त्यांच्याच तोंडी नारा आहे !!
सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
चिमटा
दैनिक पुण्यनगरी
6 सप्टेंबर2006
--------------------------------


दैनिक वात्रटिका l 22सप्टेंबर 2026वर्ष- सहावे अंक - 55 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...