Tuesday, September 27, 2022

अंधानुकरण... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
---------------------------

अंधानुकरण

नवरात्र उत्सवाच्या कथा,
सांगाव्या तेवढ्या थोड्या आहेत.
आता नवरात्रीच्या नव रंगात,
पुरुषांच्यादेखील उड्या आहेत.

जणू महिलांच्या पावलावरती,
पुरुषांचे हे नवीन पाऊल आहे!
स्त्री-पुरुष समानतेची,
वेडगळपणात तरी चाहूल आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6591
दैनिक पुण्यनगरी
27सप्टेंबर 2022

 

Monday, September 26, 2022

माथेफिरूंनो... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

माथेफिरूंनो...

एकदा अंगात आले की,
नको ते वारे घुमू शकतात.
जिकडे तिकडे जिंदाबादबरोबर,
मुर्दाबादचेही नारे घुमू शकतात.

देशप्रेम आणि देशद्रोहात,
संशयाला नक्की जागा आहे.
कानाबरोबर डोळ्यांनाही,
अगदी उघड उघड दगा आहे.

स्वतःबरोबर इतरांनाही,
संशयाच्या जाळ्यात अडकवू नका!
तुमच्याप्रमाणे इतरांचीही,
माथी उगीच भडकवू नका !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
दैनिक वात्रटिका
26सप्टेंबर2022

 

डायलॉगबाजी... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

डायलॉगबाजी

कुणी गुंगवणारे असेल तर,
जनता गुंगायलाही राजी आहे.
म्हणूनच वाऱ्यासारखी पसरलेली,
नेत्यांची डायलॉगबाजी आहे.

फसवा-फसवीच्या या खेळावर,
रोजच नवी नवी मोहर आहे!
म्हणूनच नेत्यांच्या डायलॉगलाही,
जिकडे तिकडे वन्स मोअर आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6590
दैनिक पुण्यनगरी
26सप्टेंबर 2022

 

Sunday, September 25, 2022

आधार... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
आधार
कधी इकडे गोता असतो,
कधी तिकडे गोता असतो.
कार्यकर्त्यांचे एक बरे असते,
त्यांना पाहिजे तिकडे नेता असतो.
कार्यकर्त्यांच्या जीवावर,
नेते नेहमी उदार असतात !
नेते आणि कार्यकर्ते,
एकमेकांचे आधार असतात!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8051
दैनिक झुंजार नेता
25सप्टेंबर2022

 

Saturday, September 24, 2022

सत्याघात... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

सत्याघात

परक्यांशी लढणे सोपे,
आपल्याशी लढणे अवघड आहे
मग कळते ढासळले बुरुज,
सोबत ढासळलेला गड आहे.

आघात सहन करता करता,
आपलाच घात होत जातो !
जिंकलो काय?हारलो काय?
आपण अनाथ होत जातो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8050
दैनिक झुंजार नेता
24सप्टेंबर2022

 

राजकीय मेळावे... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

राजकीय मेळावे

गर्दीला गर्दीने उत्तर,
अगदीच बिनतोड आहे.
राजकीय मेळाव्यांची,
भलतीच चढाओढ आहे.

कुठे आयजीच्या जीवावर,
बायजी उदार आहेत.
जेवढे जेवढे मेळावे,
तेवढे तेवढे सुभेदार आहेत.

स्वकीय आणि परकियांनाही
आपल्या ताकदीची झलक आहे!
मेळाव्यांची गर्दी म्हणजे,
उपद्रव मूल्याचा गोलक आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6589
दैनिक पुण्यनगरी
24सप्टेंबर 2022

 

Friday, September 23, 2022

श्रेयवादाचा सिद्धांत.... मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

श्रेयवादाचा सिद्धांत

लाटल्याशिवाय श्रेय,
कधीच श्रेय वाटत नाही.
ओढून घेतल्याशिवाय,
कधीच श्रेय भेटत नाही.

ज्याला ताणायचे आहे,
तो तो खुशाल ताणीत आहे.
हाजीर तो वजीर,
हेच श्रेयवादाचे गणित आहे.

सगळे काही माहित असूनही,
आपल्या नावाचा गजर असतो!
केवळ हा योगायोगाचा भाग,
जो कोणी वेळेला हजर असतो!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8049
दैनिक झुंजार नेता
23सप्टेंबर2022

 

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...