Tuesday, November 5, 2024

दैनिक वात्रटिका l 5नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 158 वा


दैनिक वात्रटिका l 5नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 158 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

बंडखोरीची व्यापकता...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बंडखोरीची व्यापकता

निवडणुकीचे वातावरण,
जेवढे काही तापलेले असते.
सपक्ष,अपक्ष आणि नि:पक्षांना,
तेवढे बंडखोरीने व्यापलेले असते.

ज्याच्या त्याच्या बंडखोरीला,
ज्याचा त्याचा विचार साक्ष असतो.
बंडखोरी कुणाचीही असली तरी,
तिचाही स्वतःचा एक पक्ष असतो.

कुणी चिंताग्रस्त;कुणी वादग्रस्त,
कुणाची बंडखोरी भंगली जाते !
निवडणूक कोणतीही असली तरी,
ती बंडखोरांमुळेच रंगली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8731
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
5 नोव्हेंबर2024
 

Monday, November 4, 2024

दैनिक वात्रटिका l 4नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 157 वा

दैनिक वात्रटिका l 4नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 157 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

Sunday, November 3, 2024

दैनिक वात्रटिका l 3नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 156 वा

दैनिक वात्रटिका l 3नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 156 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

 

Saturday, November 2, 2024

दैनिक वात्रटिका l 2नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 155 वा


दैनिक वात्रटिका l 2नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 155 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

शेम..शेम...

आजची वात्रटिका
--------------------------

शेम..शेम...

कुणी उमेदवार आयात केला तर,
म्हणू शकता राजकीय चाल आहे.
त्याला पार्सल म्हणा;उपरा म्हणा,
पण म्हणू नका 'इम्पोर्टेड माल' आहे.

विरोधक आरोप करू शकतात,
तुमच्यात स्त्रीदाक्षिण्याचा अभाव आहे.
पण खरी वस्तुस्थिती अशी की,
हा प्रत्येकाच्या संस्काराचा प्रभाव आहे.

आपला बाणा आणि आपली भाषा,
सांगा का आपल्या बोलीत नको ?
शब्द हे तर शस्त्र असल्यामुळेच,
विरोधकांच्या हातात कोलीत नको !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8730
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
2 नोव्हेंबर2024
 

Friday, November 1, 2024

दैनिक वात्रटिका l 1नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 154 वा


दैनिक वात्रटिका l 1नोव्हेंबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 154 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

राजकीय 'नेम' बाजी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

राजकीय 'नेम' बाजी

अगदी बरोबर ' नेम ' धरून,
राजकीय डाव टाकले आहेत.
एकाच नावाचे अनेक उमेदवार,
विधानसभेला उभे ठाकले आहेत.

ज्याचे त्यालाच कळते आहे,
कशात काय?फटक्यात पाय आहे.
शेक्सपियरनेही विचारले नसते,
नावामध्ये काय आहे ?

कुणी म्हणू शकतो रडीचा डाव,
हे राजकारणच बायकी आहे !
केवळ नाम साधर्म्य हीच,
उमेदवारीची खरी लायकी आहे !

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8729
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
1 नोव्हेंबर2024
 

Thursday, October 31, 2024

दैनिक वात्रटिका l 31ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 153 वा


दैनिक वात्रटिका l 31ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 153 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.


 

उमेदवारी अर्ज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारी अर्ज

कुणी लढण्यासाठी भरलेले असतात,
कुणी काढण्यासाठी भरलेले असतात.
नाव आणि चिन्हाचे साधर्म्य साधून,
कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात.

प्रत्येकाच्या उमेदवारी अर्जाचे,
हेतू अगदी पक्के ठरलेले असतात.
कुणी विनाकारण भरलेले असतात,
कुणी सकारण भरलेले असतात.

कुणा कुणाचे डावपेच रडीचे,
कुणा कुणाचे डावपेच नामी असतात !
एवढे कमी म्हणून की काय?
कुणा कुणाचे अर्ज मात्र डमी असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8728
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31ऑक्टोबर 2024
 

Wednesday, October 30, 2024

दैनिक वात्रटिका l 30ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 152 वा


दैनिक वात्रटिका l 30ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 152 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

भक्ती आणि शक्ती प्रदर्शन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भक्ती आणि शक्ती प्रदर्शन

कुणी शक्ती प्रदर्शन करतो आहे,
कुणी भक्ती प्रदर्शन करतो आहे.
हाय कमांडच्या आदेशानुसार,
कुणी सक्ती प्रदर्शन करतो आहे.

शक्ती काय ?भक्ती काय ?
तिचे प्रदर्शन करावे लागते आहे.
सक्ती आणि युक्ती करून,
प्रदर्शनापुरते उरावे लागते आहे.

शक्ती आणि भक्ती प्रदर्शनाचा,
फायदा कळून चुकला आहे !
शक्ती आणि भक्ती प्रदर्शन म्हणजे,
आपल्या अस्तित्वाचा दाखला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8727
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30ऑक्टोबर 2024
 

Tuesday, October 29, 2024

दैनिक वात्रटिका l 29ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 151 वा


दैनिक वात्रटिका l 29ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 151 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

काका-पुतण्यांचे संघर्ष ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

काका-पुतण्यांचे संघर्ष

राजकीय घराणेशाहीच्या नावाने,
लोकांचे शंखावर शंख आहेत.
काका पुतण्याच्या संघर्ष नाट्याचे,
दरवेळीच नवनवे अंक आहेत.

पहिल्या अंकाचा पडदा पडेपर्यंत,
दुसऱ्या अंकांची घंटी वाजते आहे.
नव्या राजकीय महाभारतामुळे,
राजकीय खळबळ माजते आहे.

पुतण्यांच्या आक्रमकतेमुळे,
काकांना धापेवरती धाप आहे !
जणू काका पुतण्यांच्या नात्याला,
सत्ता संघर्षाचाच शाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8726
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29ऑक्टोबर 2024
 

Monday, October 28, 2024

दैनिक वात्रटिका l 28ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 150 वा

 


दैनिक वात्रटिका l 28ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 150 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

वेटिंग गेम ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

वेटिंग गेम

इकडेही अगदी सेम आहे,
तिकडेही अगदी सेम आहे.
जिकडे बघावे तिकडे,
प्रत्येकाचाच वेटिंग गेम आहे.

कुणी सेटिंग लिस्टवर आहेत,
कुणी वेटिंग लिस्टवर आहेत.
कुणी चिटिंग लिस्टवर तर,
कुणी कटिंग लिस्टवर आहेत.

पक्ष आणि उमेदवारांच्याही,
बुडाखाली ब्लास्टिंग आहे !
पक्ष आणि उमेदवारांच्याही,
वेटिंग गेमची ही टेस्टिंग आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8725
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28ऑक्टोबर 2024
 

Sunday, October 27, 2024

दैनिक वात्रटिका l 27ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 149 वा

दैनिक वात्रटिका l 27ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 149 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.

संन्यासाची ऐशी तैशी...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संन्यासाची ऐशी तैशी

राजकीय संन्यास घेणारेही,
निवडणुकीत उतरू लागले.
गुंडाळलेला बाड - बिस्तरा,
पुन्हा नव्याने हातरू लागले.

निवडणुकीतल्या राजकारणाचा,
त्यांचा संन्यास खोटा निघाला.
ज्यांच्यावर होती लोकांची श्रद्धा,
तोसुद्धा नर्मदेचा गोटा निघाला.

राजकीय संन्यासाची घोषणा,
हासुद्धा राजकीय डाव आहे !
आपल्या राजकीय कंडाला,
लोक आग्रहाचे नवे नाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8724
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27ऑक्टोबर 2024
 

Saturday, October 26, 2024

दैनिक वात्रटिका l 26ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 148 वा


दैनिक वात्रटिका l 26ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 148 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

अशी ही तिकिटाची तऱ्हा ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अशी ही तिकिटाची तऱ्हा

इतरत्र तिकिटानंतर प्रवेश असतो,
येथे प्रवेशानंतर लगेच तिकीट आहे.
काल ज्यांना घातल्या शिव्या,
त्यांनाच गरजेपोटी क्लीन चिट आहे.

निवडणुकीच्या राजकारणाची,
अगदीच उलट सुलट तऱ्हा आहे.
इनकमिंग-आउट गोइंगवाल्यांचाही,
जिकडे बघावे तिकडे तोरा आहे.

घरचे झाले थोडे;व्याह्याचे आले घोडे,
ही म्हणसुद्धा सार्थ ठरते आहे !
कानामागून आले तिखट झाले,
ही म्हणसुद्धा आग आग करते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8723
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26ऑक्टोबर 2024
 

Friday, October 25, 2024

दैनिक वात्रटिका l 25ऑक्टोबर2024 वर्ष- चौथेअंक - 147 वा


दैनिक वात्रटिका l 25ऑक्टोबर2024 
वर्ष- चौथे
अंक - 147 वा l पाने -42
अंक डाऊनलोड लिंक  -
अंक वाचा.... आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना नक्की लिहा. निवडक प्रतिक्रिया आणि सूचनांना अंकात स्थान दिले जाते.
-सूर्यकांत डोळसे.
 

बुद्रुक आणि खुर्द....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

बुद्रुक आणि खुर्द

खुर्द विरुद्ध बुद्रुक आहेत,
बुद्रुक विरुद्ध खुर्द आहेत.
ज्यांना त्यांना वाटत आहे,
फक्त ते स्वतःच मर्द आहेत.

कोण बुद्रुक? कोण खुर्द?
दाव्यावरती प्रतिदावे आहेत.
तेच शेर;तेच सव्वाशेर,
काव्यावरती प्रतिकावे आहेत.

ज्या गावच्या बाभळी,
त्याच गावच्या बोरी आहेत !
आत्मविश्वासाचे हुंकार,
बुद्रुक आणि खुर्दच्या उरी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8722
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25ऑक्टोबर 2024

खोके आणि धोके... मराठीतील प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका

आजची वात्रटिका  -------------------- खोके आणि धोके  खोक्या आणि धोक्याच्या जीवावर, राजकीय पक्षांची वाटणी आहे.  खोक्या आणि धोक्याच...