आजची वात्रटिका
--------------------------
संन्यासाची ऐशी तैशी
राजकीय संन्यास घेणारेही,
निवडणुकीत उतरू लागले.
गुंडाळलेला बाड - बिस्तरा,
पुन्हा नव्याने हातरू लागले.
निवडणुकीतल्या राजकारणाचा,
त्यांचा संन्यास खोटा निघाला.
ज्यांच्यावर होती लोकांची श्रद्धा,
तोसुद्धा नर्मदेचा गोटा निघाला.
राजकीय संन्यासाची घोषणा,
हासुद्धा राजकीय डाव आहे !
आपल्या राजकीय कंडाला,
लोक आग्रहाचे नवे नाव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8724
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
27ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment