आजची वात्रटिका
--------------------------
सामाजिक गोंधळ
एकीकडे स्त्री शक्तीचा जागर,
दुसरीकडे अब्रूवरती घाला आहे.
सामाजिक दुटप्पीपणाला,
सगळीकडेच बहर आला आहे.
तेवढ्यापुरता होतो उदो उदो,
तेवढ्यापुरत्याच आरत्या आहेत.
भक्तीचा देखावा म्हणून,
साक्षीला स्त्रीशक्तीच्या मुर्त्या आहेत.
तीही रंगली जाते;तीही गुंगली जाते,
आपल्या जागरात रंगली जाते !
कधी कधी स्वतःचीच प्रतिमा,
आपल्या स्वतःकडूनच भंगली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8708
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
10ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment