--------------------------
बुद्रुक आणि खुर्द
खुर्द विरुद्ध बुद्रुक आहेत,
बुद्रुक विरुद्ध खुर्द आहेत.
ज्यांना त्यांना वाटत आहे,
फक्त ते स्वतःच मर्द आहेत.
कोण बुद्रुक? कोण खुर्द?
दाव्यावरती प्रतिदावे आहेत.
तेच शेर;तेच सव्वाशेर,
काव्यावरती प्रतिकावे आहेत.
ज्या गावच्या बाभळी,
त्याच गावच्या बोरी आहेत !
आत्मविश्वासाचे हुंकार,
बुद्रुक आणि खुर्दच्या उरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8722
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
25ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment