Monday, October 14, 2024

दसरा मेळाव्यांचा अर्थ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

दसरा मेळाव्यांचा अर्थ

दसरा मेळाव्यांचा परिणाम,
बघा नेमका काय झाला?
दसऱ्याच्या मुहूर्तावरती,
महाराष्ट्र मेळावामय झाला.

कुणी लुटले विचारांचे सोने,
कुणी ऊर्जा दिली घेतली आहे.
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर,
कुणी सगळी शक्ती ओतली आहे.

कुणाचा संदेश उघड,
कुणाचा संदेश मात्र छुपा आहे !
सारे काही राजकारणासाठी,
हा अर्थ मात्र एकदम सोपा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8711
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
14ऑक्टोबर 2024
 

No comments:

daily vatratika...18octo2024