आजची वात्रटिका
--------------------------
विरोधाभास
सामान्य मतदार राजा,
एकाच उत्तराच्या शोधात आहे.
अजूनही त्याला कळेना?
कोण कुणाच्या विरोधात आहे?
मतदार राजा समोर उभा,
सगळाच विरोधाभास आहे.
त्याच्या लोकशाही कल्पनेचा,
सगळीकडूनच सत्यानाश आहे.
मतदार राजाला कुणीतरी सांगा,
आजची तर फक्त झाकी आहे !
लोकशाहीचा खरा तमाशा,
अजून तरी बाकी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8721
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
24ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment