Friday, October 11, 2024

आचारसंहिता ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आचारसंहिता

कधी निर्णयांचा दणका,
कधी निर्णयांचा अभाव असतो.
दोन्हीही बाजूकडून,
आचारसंहितेचा प्रभाव असतो.

आचारसंहितेमुळे निष्पक्षता येते,
असा भोळा भाबडा दावा आहे.
आचारसंहिता भंगली की वाटते,
आचारसंहिता बागुलबुवा आहे.

आचारसंहिता पाळणाऱ्यांनाच
आचारसंहितेची भीती असते !
वाटा पळवाटांच्या माध्यमातून,
आचारसंहिताच सती असते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8709
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
11ऑक्टोबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...