आजची वात्रटिका
--------------------------
अतिक्रमण
राजकारणी झाले कलावंत,
राजकारणी साहित्यिक झाले आहेत.
पुढच्या ऐवजी मागच्या दाराने,
थेट विधिमंडळामध्ये गेले आहेत.
आमदारकीच्या खिरापती,
राजकारण्यांनाच वाटल्या आहेत.
कलावंत आणि साहित्यिकांच्या जागा,
राजकारण्यांनीच लाटल्या आहेत.
आपापल्या बगलबबच्चांची
नियुक्त आमदार म्हणून वर्णी आहे !
लोकशाहीच्या नावाने,
लोकांच्या हातावर शेरणी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8713
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
16ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment