Saturday, October 26, 2024

अशी ही तिकिटाची तऱ्हा ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

अशी ही तिकिटाची तऱ्हा

इतरत्र तिकिटानंतर प्रवेश असतो,
येथे प्रवेशानंतर लगेच तिकीट आहे.
काल ज्यांना घातल्या शिव्या,
त्यांनाच गरजेपोटी क्लीन चिट आहे.

निवडणुकीच्या राजकारणाची,
अगदीच उलट सुलट तऱ्हा आहे.
इनकमिंग-आउट गोइंगवाल्यांचाही,
जिकडे बघावे तिकडे तोरा आहे.

घरचे झाले थोडे;व्याह्याचे आले घोडे,
ही म्हणसुद्धा सार्थ ठरते आहे !
कानामागून आले तिखट झाले,
ही म्हणसुद्धा आग आग करते आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8723
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
26ऑक्टोबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...