आजची वात्रटिका
--------------------------
मेळाव्यांचा दसरा
दसरा मेळाव्यांचे प्रमाण,
दरवर्षीच वाढू लागले.
जे ते दसऱ्याच्या निमित्ताने,
मेळाव्यांचा दसरा काढू लागले.
जसा दसरा सण मोठा आहे,
तसा मेळाव्यांना कुठे तोटा आहे?
कुठे मेळाव्यांचा रेटा तर,
कुठे मेळाव्यासाठीच रेटा आहे.
मेळाव्यांची रेटारेटी आहे,
मेळाव्यामध्ये दाटीवाटी आहे !
मेळाव्यांचे राजकारण नाही,
ही अफवा मात्र खोटी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8710
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
12ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment