Thursday, October 17, 2024

न्यायदेवतेची नवी प्रतिमा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

न्यायदेवतेची नवी प्रतिमा

ये अंधा कानून है.....
आता असे कुणीही गाणार नाही.
आपल्या डोळ्यावरती पट्टी बांधून,
न्यायदेवताही न्याय देणार नाही.

तिच्या डोळ्यावरची पट्टी गेली,
हातामध्ये संविधानाची प्रत आहे.
हातातली तलवार गेली तरी,
न्याय म्हणजे असिधारा व्रत आहे.

आधुनिक रूपातील न्यायदेवतेला,
आपण नव्याने समजून घ्यायला हवे !
तारीख पे तारीख सोडून देऊन,
तिने अधिक गतिमान व्हायला हवे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8714
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
17ऑक्टोबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...