आजची वात्रटिका
--------------------------
नो गॅरंटी
तुमचा आमचा अपेक्षाभंग,
अगदी खात्रीने होऊ शकतो.
कुणीही कुणाकडूनही,
अगदी खात्रीने उभा राहू शकतो.
कुणाणाकडून उभे राहायचे ?
अजूनही नक्की ठरलेले नाही.
कुणीही कुणाला सुद्धा,
अजूनही गृहीत धरलेले नाही.
सगळे पक्ष आणि उमेदवारही,
अजूनही तळ्यात मळ्यात आहेत !
जे देतील जिंकण्याची गॅरंटी,
उमेदवाऱ्या त्यांच्याच गळ्यात आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8707
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
9ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment