Monday, October 7, 2024

बिग बॉस 5 चा संदेश

आजची वात्रटिका
--------------------------

बिग बॉस 5 चा संदेश

कुणाला आले बुक्कीत टेंगुळ,
कुणाला गुलीगत धोका आहे.
जो बोलतो स्वतःची भाषा,
त्यालाच तर खरा मोका आहे.

आपली बोली;आपली भाषा,
जेव्हा ओठावरती येऊ शकते.
तुमच्यासाठीही कुणाच्या दिलात,
नक्की झापूक झुपूक होऊ शकते.

डावपेच, काटाकाटी, सहानुभूती,
एखाद्या शोपुरतेच बरे आहे !
सच्चा आणि भोळ्या लोकांचे,
हे जग नाही एवढे मात्र खरे आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8705
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
7ऑक्टोबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...