Tuesday, October 29, 2024

काका-पुतण्यांचे संघर्ष ..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

काका-पुतण्यांचे संघर्ष

राजकीय घराणेशाहीच्या नावाने,
लोकांचे शंखावर शंख आहेत.
काका पुतण्याच्या संघर्ष नाट्याचे,
दरवेळीच नवनवे अंक आहेत.

पहिल्या अंकाचा पडदा पडेपर्यंत,
दुसऱ्या अंकांची घंटी वाजते आहे.
नव्या राजकीय महाभारतामुळे,
राजकीय खळबळ माजते आहे.

पुतण्यांच्या आक्रमकतेमुळे,
काकांना धापेवरती धाप आहे !
जणू काका पुतण्यांच्या नात्याला,
सत्ता संघर्षाचाच शाप आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8726
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
29ऑक्टोबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...