Wednesday, October 30, 2024

भक्ती आणि शक्ती प्रदर्शन...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

भक्ती आणि शक्ती प्रदर्शन

कुणी शक्ती प्रदर्शन करतो आहे,
कुणी भक्ती प्रदर्शन करतो आहे.
हाय कमांडच्या आदेशानुसार,
कुणी सक्ती प्रदर्शन करतो आहे.

शक्ती काय ?भक्ती काय ?
तिचे प्रदर्शन करावे लागते आहे.
सक्ती आणि युक्ती करून,
प्रदर्शनापुरते उरावे लागते आहे.

शक्ती आणि भक्ती प्रदर्शनाचा,
फायदा कळून चुकला आहे !
शक्ती आणि भक्ती प्रदर्शन म्हणजे,
आपल्या अस्तित्वाचा दाखला आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8727
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
30ऑक्टोबर 2024
 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...