आजची वात्रटिका
--------------------------
राजकीय त्याग
आपल्या राजकीय त्यागाची,
त्याला त्याला चर्चा करणे भाग आहे.
ज्या ज्या केल्या तडजोडी,
तो म्हणे त्यांचा राजकीय त्याग आहे.
राजकीय त्यागाचे राजकीय भोगाशी,
वास्तवात तर अनैतिक संबंध आहेत.
डोळे मिटलेल्या मांजराला वाटते,
आसपासचे सगळे लोकच अंध आहेत.
आपल्या भोगाचे त्यागात,
अनैतिक असे उदात्तीकरण आहे !
कुणाचा त्याग मोठा?कुणाचा छोटा?
निवडीत बसण्याचे काय कारण आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8715
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
18ऑक्टोबर 2024

No comments:
Post a Comment