आजची वात्रटिका
--------------------------
लोकशाहीचा बाजार
जीवाची झाली घुसमट,
नवी जागा ;नवे ठिकाण आहे.
गिर्हाईक जुनेच असले तरी,
नवी पाटी;नवे दुकान आहे.
जिकडे बघावे तिकडे,
सर्वत्र सारखीच चाल आहे.
दुकान कुणाचे?महत्त्वाचे नाही,
महत्त्वाचा तर ' माल ' आहे.
ज्याच्या त्याच्या दुकानावर,
आपली लोकशाही विक्रीला आहे !
सगळ्या बाजाराचे श्रेय,
मतदारांच्या बेफिक्रीला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8712
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
15ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment