Wednesday, October 23, 2024

संगीत खुर्ची ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

संगीत खुर्ची

आम्ही खरे बोललो की,
त्यांच्या नाकाला मिरची आहे.
आजकालचे राजकारण म्हणजे,
जणू काही संगीत खुर्ची आहे.

सत्तेच्या खुर्चीसाठीच,
सगळे काही रंगीत संगीत आहे.
निष्ठा - बिष्ठा सगळे काही,
जो तो खुंटीला टांगीत आहे.

सर्वच घुसखोरांच्या कानामध्ये,
आज बंडखोरीचा वारा आहे !
खुर्चीसाठी वाटेल ते...
सगळ्यांचा सारखाच नारा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका-8720
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
23ऑक्टोबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...