Tuesday, October 22, 2024

पारंपरिक सत्य...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

पारंपरिक सत्य

कुणाच्या लेकीला;कुणाच्या लेकाला,
कुणाच्या बहिण आणि भावाला आहे.
उमेदवारांची यादीच सांगते,
आपली लोकशाही फक्त नावाला आहे.

कोणत्याही पक्षाची यादी काढा,
तिथे हीच गोष्ट ठळक दिसते आहे.
लोकशाहीच्या उरावर घराणेशाही,
दर निवडणुकीलाच बसते आहे.

घरा-दारात वाटून झाले की,
सगे सोयऱ्यांचीही सोय लावली जाते !
आपली लोकशाही सुद्धा,
त्यांच्या घराणेशाहीला पावली जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------,
फेरफटका-8719
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
22ऑक्टोबर 2024
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...