आजची वात्रटिका
--------------------------
बोगस मतदार
बोगस मतदार तर,
प्रत्येक बुथवर भेटू लागले.
बोगस मतदान करणे,
मतदारांना शौर्य वाटू लागले.
बोगस मतदान करण्यात,
ज्याचा त्याचा हात आहे.
लोकशाहीबरोबर स्वतःचाही,
हा चक्क आत्मघात आहे.
बोगसगिरीत गंमत आहे,
बोगसगिरीत हिंमत आहे !
बोगसपणा कुठलाही असो,
त्याची एक किंमत आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8717
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
20ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment