आजची वात्रटिका
--------------------------
वेटिंग गेम
इकडेही अगदी सेम आहे,
तिकडेही अगदी सेम आहे.
जिकडे बघावे तिकडे,
प्रत्येकाचाच वेटिंग गेम आहे.
कुणी सेटिंग लिस्टवर आहेत,
कुणी वेटिंग लिस्टवर आहेत.
कुणी चिटिंग लिस्टवर तर,
कुणी कटिंग लिस्टवर आहेत.
पक्ष आणि उमेदवारांच्याही,
बुडाखाली ब्लास्टिंग आहे !
पक्ष आणि उमेदवारांच्याही,
वेटिंग गेमची ही टेस्टिंग आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8725
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
28ऑक्टोबर 2024

No comments:
Post a Comment