आजची वात्रटिका
--------------------------
उमेदवारीची किंमत
उमेदवारी मिळालेले निष्ठावान,
नाकारलेले बंडखोर ठरले जातात.
जे कुणी अन्याय सहन करतात,
ते अगदीच गृहीत धरले जातात.
कुणाला उमेदवारीचा धक्का,
कुुणाचा पत्ताच कापला जातो.
पक्षीय असमतोल कायम ठेवून,
बाकीचा समतोल जपला जातो.
कितीही समतोल राखला तरी,
पक्षीय राजकारण डळमळू लागते !
प्रत्येकाच्या उमेदवारीची किंमत,
प्रत्यक्ष निकालानंतरच कळू लागते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8718
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
21ऑक्टोबर 2024
No comments:
Post a Comment