आजची वात्रटिका
--------------------------
दसऱ्याची सुवर्णसंधी
आपापल्या शक्ती प्रदर्शनाला,
आता दसऱ्याचा आसरा आहे.
जिकडे बघावे तिकडे,
आता मेळाव्यांचा दसरा आहे.
आपुला तितुका मेळवू लागले
दसरा मेळावा वाढवू लागले.
आहे नाही तेवढी शक्ती लावून,
तिचे प्रदर्शन घडवू लागले.
एकाच्या गर्दीचे विक्रम,
दुसऱ्याकडून तुटायला लागले !
दसऱ्याची सुवर्णसंधी साधून,
दसऱ्याचे सोने लुटायला लागले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-8706
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
8ऑक्टोबर 2024
Subscribe to:
Post Comments (Atom)
दैनिक वात्रटिका l 15 जून 2026...वर्ष- सहावे ...अंक - 9 वा l पाने -51
दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...
-
आजची वात्रटिका ------------------------- सुज्ञास सांगणे न लगे... वाट्टेल त्याला;वाट्टेल तसे, गुळाचे गणपती पावायला लागले. उरले सुरले भक्तही म...

No comments:
Post a Comment