Thursday, October 31, 2024

उमेदवारी अर्ज...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

उमेदवारी अर्ज

कुणी लढण्यासाठी भरलेले असतात,
कुणी काढण्यासाठी भरलेले असतात.
नाव आणि चिन्हाचे साधर्म्य साधून,
कुणी पाडण्यासाठी भरलेले असतात.

प्रत्येकाच्या उमेदवारी अर्जाचे,
हेतू अगदी पक्के ठरलेले असतात.
कुणी विनाकारण भरलेले असतात,
कुणी सकारण भरलेले असतात.

कुणा कुणाचे डावपेच रडीचे,
कुणा कुणाचे डावपेच नामी असतात !
एवढे कमी म्हणून की काय?
कुणा कुणाचे अर्ज मात्र डमी असतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269,
-------------------------------
फेरफटका-8728
दैनिक झुंजार नेता
वर्ष -24वे
31ऑक्टोबर 2024
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 202 वा l पाने -45

दैनिक वात्रटिका l 21 डिसेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 202 वा l पाने -45 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/1RS7Ouagfi-rb0Ven1d...